हॉटेल
हॉटेल
हॉटेलात गेलं तं म्हने थंड काय पाह्यजे
लस्सी पाह्यजे का? थम्सअप पाह्यजे
कुठला पाहा निरा माणसायचा बजार
खान्याचा माणसायले झाला आजार
कोणी चुरपून खाये कोणी खाये दमान
कोणी खाते कमी अन् कोणी खाये जोमान
जसकाई सिलिमाचं चाल्ल इथ सुटींग
जो थो करे मोबाईवर याचेत्याचे संग चाटींग
प्रेमाच्या दरबारात भरला होता साज
हॉटेलमालक वाटे जसा इंद्र महाराज
कोणी उगाच् एकमेकायच्या हाताले धरुन बोले
कोणी कोणी पेये हॉटेलात घेते
लागली पोरीची पोराले जोरान टक्कर
एकदम लेकाले मंग येउन गेला चक्कर
सारी सारी म्हनुन माफी मांगे हिरो
इट्स ओके ओके करत पोरगी झाली झिरो
हॉटेलात गेलं की असे पाहाले भेटते किस्से
तिथं गेल्यावर मात्र खाली करा लागते खिस्से
