पाऊस
पाऊस
सुरु झाले आहेत
दिवस पावसाचे
वातावरणात रंग
भरले आहेत प्रेमाचे
पावसाने भिजवली
सृष्टी सारी
धरतीने नेसली जणू
हिरवीगार साडी
थंडगार वाहतोय
बेधुंद वारा
जमीनीवर पडतात
पावसाच्या धारा
पावसाने तुडुंब भरले
विहीरी, नद्या, नाले
पावसाचे पाणी
रस्त्यावरचं आले
पाण्यात खेळताना
मुलांना होई आनंद
कागदी बोटी बनवणे
हा तर त्यांचाच छंद
span>
पावसात खूप
भिजावेसे वाटते
पण आज भिजले की
उद्या डॉक्टरांकडे जावे लागते
गरमागरम पदार्थ दिसले
की तोंडून निघते वाव
वाफाळता चहा गरम भजी
खाऊन जाते भलतेच भाव
बाहेर निसर्ग हिरवा
मनमोहक बहरलाय
अन इथे गारव्याने
देह पण शहारलाय
हे पावसा आपल्या
धरतीला रोज भेट असा
तिचा एक जुना अन
खास मित्र जसा
तिचा एक जुना अन
खास मित्र जसा.