STORYMIRROR

Ashok Ingole

Inspirational

4  

Ashok Ingole

Inspirational

स्वार्थी प्रेम

स्वार्थी प्रेम

1 min
352


आपले खूप प्रेम आहे असे त्यांना वाटत होते

स्वतःच्या घरी दोघेही मात्र काहीच सांगत नव्हते


ती दोघे स्वतः पुढे कुणालाच मोजत नव्हती

घरच्यांची त्यांच्या मते कवडीची किंमत नव्हती


स्वतःच्या जॉबचा त्यांना होता अभिमान

परस्पर उरकले त्यांनी शुभ मंगल सावधान


दोन वर्ष संसार करून त्यांनी लग्न मोडले

स्वतःच्या मुलाला त्यांनी वाऱ्यावर सोडले


ज्या प्रेमाने जवळ आणले त्यानेच संबंध तोडले

बिना आई वडीलाचे मुल आजोबा कडे वाढले


Rate this content
Log in

Similar marathi poem from Inspirational