असे पण मुलीचे आई-वडील?
असे पण मुलीचे आई-वडील?
चांगलं स्थळ मिळाले म्हणून आनंदी झाला बाप
लगेच मुलीचे लग्न करून मिटवला डोक्याचा ताप
मुलीची आई फोनवर तिचे रोज धडे घेते
सासू-सासर्यांशी वागण्याचे, नामी सल्ले देते
मुलगी काही ऐकत नाही, कारण ती आहे सुखात
तिचे सुख बघून मात्र, आई-वडील आहेत दुखात
मुलींच्या आई-वडिलांना, आहे एक सल्ला
दुसऱ्यांच्या सुखावर तुम्ही, मारू नका डल्ला
आपल्या घरच्या सुनेवर, तुम्ही ही जीव लावा
नाहीतर तुमच्याच घरात ,होईल गनीमी कावा
