STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy Others

3  

Raakesh More

Romance Tragedy Others

शोधत फिरतोय मी

शोधत फिरतोय मी

1 min
190

कोण होती ती जीला 

शोधत फिरतोय मी 

एकाच भेटीत आठवणीत 

तिच्या विरतोय मी || 0 ||

 

एकदाच तिची माझी 

नजरानजर झाली 

रोमँटिक तो क्षण होता 

जेंव्हा ती आली 

भवऱ्यासवे तिच्यासाठी 

भिरभिरतोय मी || 1 ||

 

तेल जसं मुरतं 

दिव्याच्या वातीत 

पाणी जसं मुरतं 

सुक्या मातीत 

तिच्याच आठवणीत 

आता जिरतोय मी || 2 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance