STORYMIRROR

काव्य चकोर

Romance

4  

काव्य चकोर

Romance

अंधाराचं चित्र

अंधाराचं चित्र

1 min
509

अंधाराचं चित्र 

निव्वळ डोळ्याने दिसत नाही

ते मनाने रेखाटावे लागते..

बघ ना! 

ताऱ्यांना चमचमण्यासाठी

अंधाराला भेटावे लागते..!!


तसा दिवसा उजेडीही

कधी कधी

चंद्रमा नजरेस पडतो..

पण सौंदर्य खुलवण्यासाठी

तो सुद्धा 

अंधाराची वाट पाहत असतो..!!


रेखाटून बघ कधीतरी

तू सुद्धा

अंधाराचं मनमोहक चित्र..

गंधळणाऱ्या रातराणीला

श्वासात भरून घेताच

रोमांचित होईल तुझं मन 

अन् सुखावतील गात्र..!!


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance