शिक्षा प्रेमाची
शिक्षा प्रेमाची
शिक्षा प्रेमाची
उगवत्या सूर्याच्या साक्षीनं,
बांधलंस प्रेमाच्या बंधनात,
गोड गुलाबी डोळ्यांनी,
अडकून ठेवलेस वचनात,
खुणावता मधाळ अधरानं
गुंतलो खळाळत्या हास्यात,
करायची नव्हती पूर्ण स्वप्न,
तर का आलीस जीवनात,
माझा मी होतो ग संपूर्ण,
अडकवलेस का गोड स्वप्नात ।।

