STORYMIRROR

Meenakshi Kilawat

Romance

4  

Meenakshi Kilawat

Romance

"प्रेम स्वप्न पाहिले मी"

"प्रेम स्वप्न पाहिले मी"

1 min
428

मी इथे अन तू तिथे असे

किती दिवस चालायचं

स्वप्ना स्वप्नातच तुझ्यारे

असे कितींदा रमायचं।।१।।


स्वप्न पाहता चहूकडे माझे

नेत्र शोधत असती रे तुला

परंतू तू नसतो सोबतिला

विचार करता लाज येई मला।।२।।


प्रेम स्वप्न पाहिले मी सदा

भास तुझाच होतोय दिवा स्वप्नात

उगाच पडले रे तुझ्या प्रेमात

वाटे मजशी या संसारात ।।३।।


समोर ये स्वप्नातूनी सख्या

पुरे कर ना रे हे बहाणे

नाही तर बंद कर तूझे

स्वप्नामधले येणे जाणे ।।४।।


आठवणी या स्वप्नातिल 

गोडवा देती रे सदा मनी

आनंदानं फुलतोय बहर

अशी न्हाते मी तनीमनी ।।५।।


स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते

असा वागशिल माझ्या जीवनी

मी न राहिली माझी आता

तुझा धावा करते प्रत्येक क्षणी।।६।


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance