STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

4  

Manisha Wandhare

Romance

स्पंदने अबोल का?...

स्पंदने अबोल का?...

1 min
8

स्पंदने अबोल का? ,

बोलक्या डोळ्यात आज ,

शब्द अबोल का?,

मला छळण्याचा तुझा,

आज हा विचार का ?, ...

तु माझे काळीज ,

तुच धडधड वाढवणारी,

तरी सांग ना मला ,

तुझा मला छळणारा,

श्वासही मंद मंद का? ...

ओठी गुलाब थरथरणारा,

आज हिरमुसला का?...

उशीर थोडा थोडा ,

परी जिव तुजसाठी वेडा,

गुंतल्या कामातून निघता,

तुज साठी केला राडा ,

तरीही उदासी चेहऱ्यावर का?,

मिलनाच्या ओल्या घडीला,

उष्ण वाऱ्याच्या लाटा का? ...

हसुन घे ना मिठीत,

तुच माझी प्रिती ,

नको दूरावा तुझा,

उरात दडली भिती ,

चाहूल सखीची अमृतसंध्या,

सांज ओली थांबशील का?

मेघ दाटूनी आली रंगा,

सर रिमझीम बरसेल का?

स्पंदने अबोल का? ,

बोलक्या डोळ्यात आज ,

शब्द अबोल का?,

मला छळण्याचा तुझा,

आज हा विचार का ?, ...



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance