आहे तुला काही सांगायचे
आहे तुला काही सांगायचे
आहे तुला काही सांगायचे
एकांतात तुझ्याशी
खूप काही आहे बोलायचे
तुला पाहूनी शब्द माझे
अळखळतात किती दिवस
असे हे चालायचे
आहे तुला काही सांगायचे
जुनी ती पाऊलवाट
मोहरल्या स्वप्नांची ही पहाट
नजरेतूनी पार हृदयात भिनते
ओठात अडकते शब्दांची लाट
कसे आवरू मी कसे सावरू मी
मनाला कसे आज मनवायचे
आहे तुला काही सांगायचे
दरवळ वाऱ्याची सांजवेळी
स्पर्शातूनी रात रंगते ही काळी
मनाला तू वाटे नेहमी हवाहवासा
निशब्द मी झाले
कसे कवितेतून सारे मांडायचे
आहे तुला काही सांगायचे...

