STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

4  

Manisha Wandhare

Romance

ओढणी...

ओढणी...

1 min
15

तलम मखमली स्पर्श,

रेशमाच्या धाग्यांना हर्ष ,

रेषा रेषा नाजूक विनता ,

दिसते सुंदर खांद्यावर घेता...

वाऱ्यावरती भिरभिर करीते ,

जणू सख्याशी कोड्यात बोलते ,

पाठमोरी मी ती हळूच लटकते,

गती स्पंदनाची वाढते ...

हळूच पाखरण चेहऱ्यावर येते ,

जणू चंद्र ढगाआड लपते ,

बोटांनी बाजूला सारून ,

प्रेमाचे रंग खुलते ...

लाजुनी बोटांना वेढते ,

गाठ कधी पदराला पडते ,

प्रेमाची ती साद घालते ,

ओढणी रेशमी बंध जोडते ...


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Romance