मातृत्व
मातृत्व
जन्म जरी दिला मी बाळा तुला,
कर्म मात्र तुझे तुला करायचे आहे
घास जरी चिऊकाऊंचे भरवीले मी तुला,
तुझा तुलाच ते खाउन पचवायचे आहे
बोट पकडून चालायला जरी मी शिकवले,
संघर्षाच्या वाटेवर तुलाच सावरायचे आहे
उभा ठाकला अडचणींचे डोंगर समोर,
तुलाच तो डोंगर दूर सारायचे आहे
मातृत्व लाभले तुझ्यामुळे मला
तुला यशस्वी होऊन तुझे कर्तृत्व दाखवायचे आहे
तुझं उज्ज्वलं भविष्य तुझ्याच आहे हाती
तुलाच ते मेहनतीने घडवायचे आहे

