ऐक सखी गं
ऐक सखी गं
ऐक ऐक सखी गं तुझ स्वरूप
नटायची ग हौस खूप
दिसतेही सोज्वलं रूप
मदतीला धावण्यासाठी
असतो तुला फार हुरूप
ऐक ऐक सखी गं तुझ स्वरूप
बोलते जणू सडेतोड
पण मनात काही नसत
वाटलं किती परखड तरी
मोकळेपणाचच् ते असत
ऐक ऐक सखी गं तुझ स्वरूप
ऑनलाईन शोधते रेसिपीज
अन घालते रेसिपिचा घाट
एकदा try केली रेसिपी
की लगेच तिची तोंडपाठ.
ऐक ऐक सखी गं तुझ स्वरूप
सन्मान करू सारे तुझा
तु शुभेच्छाचा कर स्वीकार
मिळो तुला खूप आनंद
होवो सारी स्वप्ने साकार