नवरात्री
नवरात्री
नवरात्री च्या नऊ दिवस
करता देवीचा जागर........
घरातल्या स्त्री चा करता का
पण आदर.....
नऊ दिवस असते देवीला नवी साडी...
घरातल्या म्हातारीला देता फाटकी चोळी..
देवी आदी शक्ती माया,देता तिला सम्मान...
अशिक्षित आईचा करता का अपमान...
आदी माया जगदंबा ही सुद्धा
एक स्त्री च आहे..
आणि प्रत्येक स्त्री सुद्धा आदी
शक्तीच आहे.....
स्त्री कडे वाईट नजरा टाकणे सोडा...
वाईट नजरे पाहणाऱ्यांचे आधी डोळे फोडा..
उपवास धरून उपयोग काय जर होत नाही
स्त्री चा सम्मान.....
तेव्हाच देवी स्वीकारेल भक्ती
जेव्हा द्याल स्त्री ला मान...
