STORYMIRROR

Karan Gaikwad

Action Others

3  

Karan Gaikwad

Action Others

परिस्थिती

परिस्थिती

1 min
198

आज आहे गरीब तु,

उद्या ही असशील कशावरून.....

काय उपयोग आहे माणसा ,

उगच मनातल्या मनात झुरुन........

गरिबीचा काळ रात्र ही ,

पहाटेला टळणार..........

परिस्तिथी बदलत असते ,

कधी तुला हे कळणार......

छोट्या छोट्या अपयशाला,

नको आत्ता ताणू .........

कष्ट कर मेहनत कर,

हार नको तु मानू..........

छोट्याश्या हारी नंतर ,

जीत तुला रे मिळणार..........

परिस्थिती बदलत असते,

कधी तुला हे कळणार......

सुरुवात तर तु कर आधी,

नक्की यशस्वी होशील.........

यशस्वी झाल्यानंतर ,

आनंदात गाशील...........

अपयशाच्या ठोकरा नंतर,

यश तुला रे मिळणार.......

परिस्तिथी बदलत असते ,

कधी तुला हे कळणार......

आज आहे गरीब तु,

उद्या तसा तु नसणार..........

तुझ्यातील जिद्द आत्ता,

साऱ्या जगाला दिसणार......

काट्यांचा हा कच्चा रस्ता,

नक्की फुलांकडे वळणार........

परिस्तिथी बदलत असते ,

कधी तुला हे कळणार......

 

 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Action