मैत्री एक श्वास
मैत्री एक श्वास
आपल्यावरची माया पण दाखवते,,
कधीकधी हक्कानं दरडावते..
मैत्री म्हणजे ...
जगण्याचा श्वास जणू,,
पावलागणिक आपल नातं निभावते.
मैत्रीची व्याख्या ...
कधीच होणे नाही,
झालीच जरी व्याख्या तरी
अचूक जमणे नाही.
...कारण...
पैलू या मैत्रीला अनेक असती,
मैत्रीच्या प्रकाशाने
लखाखती दिशा दाही.