तुझ्याविना
तुझ्याविना
काय सांगू आई मला काही सुचना
तुझ्याविना आई मला काही रुचना
करता डोळे बंद दिसे आई तुझा चेहरा
आठवणी मंदी तुझ्या होई जीव बावरा
जिकडे तिकडे चहुकडे तुझेच ग भास
आठवुनि भरून येई तु भरविलेला घास
सारे दिसती पुढती पण आई दिसना
तुझ्याविना आई मला काही रुचना
आजी आजोबाच्या मांडीवर बसूनी
ऐकलेल्या गोष्टी त्या अजून घुमती कानी
लगीन गाठ बांधूनिया झाली पाठवनी
काळजाच्या गाठीला बांधुनि आठवणी
स्वप्न नव्या जीवनाची नव्या पाऊणखुना
तुझ्याविना आई मला काही रुचना
आळशी,आगाऊ मला समजू नको फार
तुझ्या शिकवणीचे बोल आई जपेन मी सार
सासू सासऱ्यांसि जपेल नाही व्हायची तक्रार
माया बहिणीवनि करेल नणंदेवरी अपार
काय सांगू माहेराची आठवण तुटना
सासरच्या अंगणाची आता सवय सुटना