ओढ नात्यांची
ओढ नात्यांची
मनापासून जपली जातात
ती नाती आपली असतात
अस बघायला गेल तर
जनावरांना जीव लावला
तर ती मुकी असूनही लळा लावतात.
माणसाला अक्कल हुशारी असतेच
पण नाती जपताना मात्र
स्वार्थिपणा आडवा येतो
अस बघायला गेल तर बघा ना
आपला दारात बसलेला माँटी देखील
आपल्या मालकाशी इमानदारी निभावतो.
कधी कधी तर रक्ताची नाती देखील
संकटकाळात पाठ फिरवतात,
पण मायेनं, आपुलकीनं जोडली गेलेली नाती
खंबीरपणणं आपल्या सोबत उभी राहतात.
आयुष्यानं एक धडा शिकवाला,
नाती तिच जपावी जी मनापासून तुम्हाला जपतात.
सुखाचे क्षण सोबत साजरे करो वा ना करो
पण अडी अडचणीत मात्र हक्कानं आपली आसवं टिपतात.
तेढ निर्माण करणारी नसावी
ओढ लागावी अशी नाती असावी
हेवेदावे करत धुसफुसणारी नसावी
नाती अशी असावी जी ....
मोकळेपणाने जगावी आणि
आपलेपणाने कायम समाधानी दिसावी.