पाठशिवणीचा खेळ
पाठशिवणीचा खेळ
जीवन आहे एक
पाठशिवणीचा खेळ,
सुख आणि दुःखाचा
घालावा लागतो मेळ.
माया, ममता,व्यवहार
या साऱ्यांची करून मिसळ,
ताळमेळ करून जगलात
तर आयुष्य होईल सोपे सरळ.
जगण्याची बदलली रीत
सगळीकडे नुसती पळापळ,
सिरियस होऊन जगण्यापेक्षा
व्हावं थोडं अल्लड थोडं अवखळ.