काजवा
काजवा
दाट घन घोर अंधार
चमकताच काजवा
वाटे मनाला दिलासा
आशेचा किरण बरवा
तिमीरात शोभिवंत भासे
काजव्यांच्या दीप ओळी
कुणी रेखाटल्या जणु
काळ्या पटलावर रांगोळी
तिमीर सारतो काजवा
चमकूनी दावी प्रकाश
अंधरल्या जागी करी
लखलखीत अवकाश
आहे मनी सदा आस
व्हावे काजवा जीवनी
सारण्या दुःख दलितांचे
हीच सदिच्छा मनोमनी
