STORYMIRROR

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

3  

" पुष्पाग्रज. " गायकवाड आर.जी.

Abstract Action Inspirational

डंका वाजे रशियात

डंका वाजे रशियात

1 min
190

जात पात चाले या भारतात 

अण्णा भाऊंचा डंका वाजे रशियात....


रशियात होते अण्णा भाऊ गेले

किर्ती त्यांची मोठी अजरामर झाले

देशाबाहेर त्यांचे पुतळे उभारतात...


दिड दिवस शिकुन साहित्यकार झाले

परदेशात साहित्य ते चित्रपट निघाले 

होतो अभ्यास विद्यापीठ, परदेशात...


अण्णा भाऊंचे गुणगान किती रोज गावे

साहित्यरत्नाला या भारतरत्न हवे 

उठला,पेटला समाज शासनां घे लक्षात...


अण्णा भाऊ देशाला या कळणार कधी?

पुतळे त्याचे उभे बाहेर देशांमध्यी,

सन्मान अण्णांचा खरा व्हावा या देशांत ...


अण्णा भाऊ कळला साऱ्या जगाला आज

नियती शासनाची जाणतो सारा समाज 

जातीयवादी शासनाची वाईट ही नियत....


अण्णा भाऊंना भारतरत्न शासनाने द्यावे 

शिकण्यासाठी धडे त्या रशियाला जावे,

येते कीव शासनाची,वाटे मज खंत....


अण्णा भाऊंचा डंका वाजो घराघरात

नाही झाला लोकशाहीर असा या जगात 

अण्णा भाऊ हवे भारतरत्न सन्मानित....



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract