कधी मीकधी तु
कधी मीकधी तु
1 min
230
कधी मी रुसेन तुझ्यावर
कधी तु नाराज होशील
कधी मी भांडेल तुझ्याशी
कधी तु माझ्यावर रुसशील
कधी तु समजून घे मला
कधी मी समजून घेईन
कधी तु रुसवा काढ माझा
कधी मी तुझा रुसवा काढीन
कधी तु खूप बोलत जा
मी फक्त तुझ ऐकत राहीन
कधी तु माझं ऐकत जा
जेव्हा मी बडबडत राहीन
कधी तु कधी मी
एकमेकांसाठी जगत राहू
एकमेकांच्या ओढीने
सांगतीने आयुष्याचे रंग पाहू