STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

4  

Manisha Wandhare

Romance

पुन्हा भेटशील का ?...

पुन्हा भेटशील का ?...

1 min
357

तुला ओझरते पहाणे ,

माझ्या मनाला नको बहाणे ,

प्रेमात पडलो मी वेडा पिसा ,

झोप न रात्रीला ,

चांदण्यात फिरतो मी ,

तुझ्यासाठी अधीर मन झाले ,

तुला आडून आडून बघतो ,

तुझे बोलणे , तुझे हसणे ,

सारे काही मनावर कोरते ...

तू भेटलीस अनाहूत मला ,

मी स्तब्ध पुन्हा ,

बोलता बोलता हसून ,

काहीतरी ? म्हटलंस तु ,

मनाने तेच वाक्य हेरलं ,

आठवते मन पुन्हा पुन्हा ...

आता रोज त्या वाटेला ,

नजरेचे येणे जाणे ,

तू भरकटलीस ना तिकडे ,

काय चुकले माझे ,

तुझे मन झाले ना दिवाने ,

मन व्याकूळ शोधत फिरे ,

काजव्यांचा प्रकाश पुरेसा मला ,

तू ये ना भेटण्या ,

अंधारातही चमकेल मनाचा दिवा ,

श्वास सांगते ही गुज ,

तूच मनाला हवा हवा ...

हृदयातून माझेच स्पंदने चोरले ,

कधी चांदण्यातून चालताना ,

हळूच सावरले ,

चंद्र तूच माझा ,

पहावे तुला दिनरात ,

घट्ट मिटून पापण्या साठवत जातो मनात ,

तुला भेटताच मी माझा ना उरलो ,

क्षणाक्षणाचा हा खेळ ,

आतुर जाणिवां वाटल्या ,

मनपाकळ्या तुझ्या वाटेत अंथरल्या ,

मकरंद हा प्रेमाचा ,

तु फुल होशील का?


सांग ना प्रिये ,

पुन्हा मला भेटशील का ? ...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance