STORYMIRROR

Suhas Bokare

Romance Others

4  

Suhas Bokare

Romance Others

गझल - विचलित

गझल - विचलित

1 min
3

गहिवर गळ्यातच दाटले, हसले असे पण वाटले

नख पापणीस उगाच मी, पुसले असे पण वाटले


परवाच कार्यक्रमात त्या, जमले तुला बघण्यास ते 

ह्रदयी मला तर बाणही, घुसले असे पण वाटले


चहुबाजुला दिसले जसे, गिनले तिथे प्रतिबिंब मी ...

पण आरशातच आरसे, दिसले असे पण वाटले


भिनलीस अंगभरात तू, बरखा हवेत मधाळली ...

नसतात हो मधुमासही, असले असे पण वाटले


शिरल्यात आठवणी जणू, अतिथी बनून मना मधे 

चिकटून नंतर पाहुणे, बसले असे पण वाटले


कुरवाळण्यास तुझ्या बटा, निजलो तुझ्याच कुशीत मी 

वर ओठही मिलनात या, फसले असे पण वाटले


क्रम साधण्यास रमी मधे, असलो जरी नवखाच मी ...

विपरीत पान कुणीतरी, पिसले असे पण वाटले



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance