कोजागिरी
कोजागिरी
चंद्र उगवला आकाशी
घेवूनी अमृताचा कलश..!
स्वाद भरण्या दुधात
धरे चांदण्यांचा प्रकाश...!!
दिवसामागून दिवस सरले,
ना भेट नुसती आठवण..!
पूर्णचंद्र बघूनी कसे
व्याकुळ झाले ग मन..!!
किती छान दिसतेस सखे
हरिणीपरी गोजिरी तू..!
जणू भासते आज
मजला माझी कोजागिरी तू.
बघण्या तुझ्यातला चंद्र
प्राण कंठाशी आला..!
तुझ्या मिठीत येण्या
देह अधीर झाला..!
नभातील तू चटक चांदणी
येशील का ग माझ्या अंगणी..!
कोजागरीची ही लोभस रात
न्हावू घालीन केशरी दुधानी..!!

