जीव तुझ्यामध्ये गुंतला..
जीव तुझ्यामध्ये गुंतला..
तुझ्या माझ्या प्रेमाची
अजब ही कहाणी..
मानल तर खरं नाहीतर
नुसत्या आभासाच्या खाणी..
न बघण..भेटण.. न स्पर्श
प्रत्यक्ष कधी अनुभवला..
काहीच कळेना तरी
जीव तुझ्यामध्ये गुंतला..
खूप खास आहेस तू
इवल्याशा ह्या मनात..
जीव झालीस माझा
येऊन माझ्या आयुष्यात..
नाते जुळण्यामागे नियतीचे
नक्कीच काही गणित असेल..
प्रेमकहाणी पूर्ण होवो न होवो
माझ्या प्रेमाची साथ सदैव असेल..

