माझा श्रावण
माझा श्रावण
माझ्या नयनांची भाषा
सखे तुला कधी कळेल का
भिरभिरे वारा
जशा तुझ्या येरझारा
मला पाहुन तुझ मन
माझ्याकडे वळेल का
सखे तुला कधी कळेल का
तु ग आहेस मृगनयनी
केलीस जादुची करनी
विरहात झालो वेडा
तोल माझा ढळेल का
सखे तुला कधी कळेल का
ईकडे तिकडे पाहतेस
तिरपी नजर टाकुन जातेस
माझा दुरावा तुला कधी
माझ्यासारखा छळेल का
सखे तुला कधी कळेल का
वसंतातली तु कोवळी पालवी
ग्रीष्मातली तु प्रेम सावली
श्रावणातल्या या झोपाळ्यावर
मन तुझ सखे झुलेल का
सखे तुला कधी कळेल का
सखे तु येऊन सोनसकाळी
अंगी लावुन गुलाबी लाली
दवबिंदुचा होऊन मोती
हातावर सखे तरळेल का
सखे तुला कधी कळेल का

