मनातील चंद्र
मनातील चंद्र
तुझ्या ह्रदयातील चंद्र
भाळला माझ्या गाली
चांदण्याच्या रातीला
पसरली लाली
चांदण्यात भिजुन आले
भाळी शोभते चंद्र कोर
आडोशाला लपुन बसला
सौन्दर्याचा चितचोर
तु जिंकावे नेहमीच म्हणून
मी जिंकूनही नेहमीच हरते
चांदण्याची भरली रात
तुझ्या आठवणीत सरते
दिसली मनाची तळमळ
दिसले तुझ्या ह्रदयातील घाव
माझ्या अबोल वाणीतील
कळले नाही तुला मुके भाव
कशी मोडु मी डाव
आहे जीवनाचा सारीपाट
वळणे आली कितीही तरी
दोघांची एकच वाट

