STORYMIRROR

JYOTI GOLE

Romance

4  

JYOTI GOLE

Romance

जलधारा

जलधारा

1 min
488

तू तर असशी मुक्त वारा

ती तर निर्मळ जलधारा,

कशा कोणास ठाऊक

जुळल्या मनांच्या तारा.


ठाऊक ते जलधारेसही

अखेर सागरातच जाणे,

परि का ऐकू येई तिजला

वारयाच्या मनीचे गाणे.


वारा घालतसे तिज

हृदयातून आर्त शीळ,

आणि ऐकताच शीळ

तिच्याही मनास पीळ.


क्षणभर विसर सागराचा

तीही घालतसे आर्त साद,

मनास भुलवी तिच्या अन्

वारयाचा तो प्रीतभरा नाद.


वारयाचा अलवर स्पर्श

मग तीही मोहरून जाई,

न ठेवता वारयाची तमा

नकळतच वारयाची होई.


जलधारा देतसे वाऱ्यास

प्रेमाचे मग ते काही थेंब,

वाराही होत असे आनंदी

तिच्या प्रेमाने न्हावून चिंब.


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance