STORYMIRROR

Sirajuddin Momin

Romance Others

4  

Sirajuddin Momin

Romance Others

व्याकूळ डोळे अंथरलेले

व्याकूळ डोळे अंथरलेले

1 min
348


मला सामावून घेणारी

दीर्घ रात ती

तूच होती

मला उजेड दावणारी

प्रभातही ती

तूच होती


तेव्हा तूच होती

श्वास माझे

तूच होती

उच्छवास माझे

स्पंदने हृदयातील माझ्या

तूच होती

लहरी रक्तातील माझ्या

तूच होती


माझे आकाश तूच

अवकाश तूच

सर्वकाल माझा

क्षण, क्षणार्ध तूच


झोप अनावर होताना

झुल्यावर तूच झुलवायची

तुझीच स्वप्ने

झोपेत मला

अलवार झेलायची


जाग येताना

पापण्याआड तूच असायची

डोळे किलकिले होताना

चिमण्या मुठीपलिकडे

तूच उभी असायची


होती माझे चित्त तूच

मनी मानसी नित्य तूच


तुझ्या आस्तित्वाची प्रत्येक खूण

वेटाळत मला रहायची

अवघे विश्व माझे

व्यापलेली तूच असायची


तुझ्याचमुळे होते

बाल्य माझे मंतरलेले

तुझ्या दिशेकडे

व्याकूळ डोळे

आता माझे अंथरलेले.



Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance