STORYMIRROR

Sirajuddin Momin

Others

3  

Sirajuddin Momin

Others

दिवसः प्रेमाचे

दिवसः प्रेमाचे

1 min
242

सृजनत्व तरारून उठण्याचे दिवस

    कल्पनांना धुमारे फुटण्याचे दिवस

    अनावर जिगीषेने जागलेले दिवस

    बिलोरे क्षण मागे ठेवून 

    कोणत्या दिशेने जातात निघून 

    कळत नाही ...


    मोरपंखी स्पर्शांचे मुलायम दिवस

    फूलपंखी तरंगण्याचे अलवार दिवस

    सोनेरी स्वप्नांचे सकवार दिवस

    तरल निरागस रूपे कोरून 

    कोणत्या दिशेने जातात निघून 

    कळत नाही ...


   रसगंध टिपण्याचे मधूर दिवस 

   आनंदाने विभोर होण्याचे दिवस

   प्राजक्त पुष्पांच्या वर्षावांचे दिवस

   सुंगधी कणांचे दान देऊन

    कोणत्या दिशेने जातात निघून

    कळत नाही...


    झावळ्यातून डोकावण्याऱ्या चंद्रमांचे दिवस

    दऱ्यातून झरणाऱ्या जोत्स्नांचे दिवस

    क्षितिजावर साकारणाऱ्या लालिमांचे दिवस

    जाणीवांना सोनसळी झिलई देऊन 

    कोणत्या दिशेने जातात निघून 

     कळत नाही...


     आयुष्याच्या एकेका मुक्कामावरून

     आठवांचा परिमल दरवळत ठेऊन

     मनाचा गाभारा विव्हलतेने भरून

     ओठांवर आर्त विराणी ठेऊन 

     कोणत्या दिशेने जातात निघून

      कळत नाही ...


Rate this content
Log in