Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Sirajuddin Momin

Others

3  

Sirajuddin Momin

Others

दिवसः प्रेमाचे

दिवसः प्रेमाचे

1 min
332


सृजनत्व तरारून उठण्याचे दिवस

कल्पनांना धुमारे फुटण्याचे दिवस

अनावर जिगीषिने जागलेले दिवस

बिलोरी क्षण मागे ठेऊन

कोणत्या दिशेने जातात निघून

कळत नाही ...


मोरपंखी स्पर्शांचे मुलायम दिवस

फूलपंखी तरंगण्याचे अलवार दिवस

सोनेरी स्वप्नांचे सकवार दिवस

तरल निरागसरूपे कोरून

कोणत्या दिशेने जातात निघून

कळत नाही ...


रसगंध टिपण्याचे मधुर दिवस

आनंदाने विभोर होण्याचे दिवस

प्राजक्तपुष्पांच्या वर्षावांचे दिवस

सुंगधी कणांचे दान देऊन

कोणत्या दिशेने जातात निघून

कळत नाही...


झावळ्यातून डोकावणाऱ्या चंद्रमांचे दिवस

दर्यातून झिरपणाऱ्या जोत्स्नांचे दिवस

क्षितीजावर साकारणाऱ्या लालिमांचे दिवस

जाणीवांना सोनसळी झिलई देऊन

कोणत्या दिशेने जातात निघून

कळत नाही...


आयुष्याच्या एकेका मुक्कामावरून

आठवांचा परिमल दरवळत ठेऊन

मनाचा गाभारा विव्हलतेने भरून

ओठांवर आर्त विराणी ठेऊन

कोणत्या दिशेने जातात निघून

कळत नाही...


Rate this content
Log in