कॉलेजात भेटल्यावर
कॉलेजात भेटल्यावर
भेटतो तेव्हा कॉलेजात आपण
अनावश्यक भांडणात गुंतून पडतो
कित्येक हेवेदावे,
उकरुन काढतो
दुर गेल्यावर मनाचे
विश्व तरीही शांत होत नाही
मग पुन्हा भेटण्याची आतुरता
कधी क्षमा मागत जाण्याचा वेडेपणा
कधी चुका करीत जाण्याचा......
व कदाचित......
पुन्हा भेटल्यावरही
तोच भांडणतंटा ,गैरसमज
मग पुन्हा दुरावल्यावरही
मनाचे सर्व भावनाचे
गाभार रिक्त झालेले...
व पून्हा एकदा....
तुला भेटण्याची आतुरता
व आसवांचा पाऊस......

