पिकलं पान
पिकलं पान


पिकलं पान आज ना उद्या
गळून पडणार,
त्याचं दुःख ना फांदीला
ना मुळांना होणार
फांदी वाढली अशी ही
पानांच्या जीवावर,
मुळं ही गेली तशी
जमिनीत खोलवर
आव आणतात फक्त
आपण असल्याचा स्वावलंबी,
प्रत्यक्षात मात्र दोघेही
आहेत येथे परावलंबी
झाले नाही दुःख तरी
कळेल किंमत कधीतरी,
जेव्हा फुटणार नाही
नवी पालवी तेव्हातरी