आयुष्य एक रंगमच
आयुष्य एक रंगमच


आयुष्य एक रंगमंच
आपण सारे कलाकार,
जन्म-मृत्यूच्या प्रवासात
साकारतो आविष्कार...
नशिबात विधीलिखित कार्ये
कठपुतली सम नाचवती,
दोरी देवाच्या हाती
भोग मानव भोगती..
सादर करती कला
भावनांना विविध अंगी,
नात्याचे रुप अनेक
कर्तव्यात रोज रंगी...
रंगरांगोटी करुन घेती
बहुरुपीची सोंगे फार,
चेहऱ्यावर मुखवटे चढवून
पार पाडती सोपास्कार...
करावे भाग्याचे कर्म
समजून प्रेमाने जगावे,
अंत जवळी येता
सगळ्यातून बाहेर पडावे...