आयुष्य एक रंगमंच
आयुष्य एक रंगमंच
आयुष्याच्या रंगमंचावर विखुरलेले आहेत सर्व पात्र
वरून आनंदी दिसणारे सुद्धा आतून आहेत दुखी मात्र
सुख म्हणजे प्रकाश तर दुःख म्हणजे अंधकार भासतो
आयुष्यात आनंदच असावा असा प्रत्येकाचा ध्यास असतो
आशेचे किरण शोधण्यासाठी अंधारात प्रवास करावा लागतो
खूप आनंद मिळविण्यासाठी मोठ्या दुःखाचा अनुभव घ्यावा लागतो
कलाकार रंगमंचावर आपलं पात्र सादर करण्यासाठी धडपडत असतो
मिळालेल्या जीवनात पुढे जाण्यासाठी कठीण संघर्ष करत असतो
नात्यातील पात्रांमध्ये गुंतून स्वतःला सिद्ध करत असतो
आयुष्यभर स्वतःच्या मनाप्रमाणे तो कधीच जगत नसतो.
