दैव शक्ती. (भजन)
दैव शक्ती. (भजन)
देवा तुझ्या शक्तीचा नाही कुठे ठाव.
मुक्तीचा मार्ग आता आम्हाला तू दाव.
जगी आलो आम्ही सारे भोगायला भोग
तुझ्या मर्जी विना नाही सुखाचे योग
तूच शमवू शकतो आमची सुखाची हाव
मुक्तीचा मार्ग देवा आम्हाला तू दाव-----------1
भौतिक सुखाच्या नादी लागलो रे सारे
चहूकडे आमच्या आहे मोहाचे पसारे
आमच्या मनी येऊ दे भक्तीचा भाव
मुक्तीचा मार्ग देवा आम्हाला तू दाव--------------2
सत्कर्माची बुद्धी असू दे आमच्या ध्यानी
वाईट आम्हा या जगात म्हणो नाही कोणी
भक्तीच्या सागरात बुडो आमची नाव
मुक्तीचा मार्ग देवा आम्हाला तू दाव---------------3
देवा तुझ्या शक्तीचा नाही कुठे ठाव
मुक्तीचा मार्ग आता आम्हाला तू दाव.
