कोरोनाचा तो काळ
कोरोनाचा तो काळ
कोरोनाच्या उद्रेकाने जग असे काही हलवले
भल्याभल्यांनी आपले प्राण क्षणार्धात घालवले
अनेकांची नोकरी गेली धंदे पडले बंद
गाणे फिरणे खेळणे हे बंद पडले छंद
सुशिक्षितांनी घरी बसूनी केले अपुले काम
अशिक्षितांना प्रश्न पडला कुठे गाळावा घाम
गावाकडची शेती सोडून जे शहराकडे होते गेले
कोरोना ने नोकरी घालवून त्यांना गावाकडे नेले
शाळा बंद झाल्यामुळे मुले घरीच राहली
त्यांना घरी बघून पालकांची चिंता वाढली
ऑनलाइन शिक्षण पद्धतीने अभ्यास झाला सुरू
सर्वच प्रश्नांचे उत्तर देणारा मोबाईल झाला गुरु
रुग्णालयात बेड नव्हते चिंतेत होते आप्तजन
प्रत्येकाला वाटे यांना पुरेल काहो ऑक्सिजन
अशा या संभ्रमित वातावरणात सर्व जगत होते
कोरोना बाधित रुग्ण मात्र मृत्यूची झुंजत होते
त्रिसूत्री चे पालन करून सर्वांनी धैर्य दाखविले
संक्रमणाची साखळी तोडून कोरोनाला पळविले
