सुखाचा शोध
सुखाचा शोध
जरी सुखासाठी मन सदैव आसुसलेलं असते
तरी सुखाच्या वाटेवर दुःख हे लपलेलं असते
काहींच्या मते संपत्ती म्हणजेच सुख असते
पण येथे श्रीमंतांना ही रात्र रात्र झोप नसते
सर्व काही असून सुद्धा रात्रभर जागणारे बघितले
काहीही नसताना उपाशीपोटी झोपणारे बघितले
सुख शोधताना कळले, सगळीकडे दुःखच आहे
पण जिथे मनःशांती आहे, तिथेच खरे सुख आहे.
