दर्शन विठोबाचे
दर्शन विठोबाचे
पंढरीला जाऊन आलो,
दर्शन मी घेऊन आलो
आता कुठे जावे हे कळेना,
मन माझे कुठेही रुळेना
पुंडलिकाच्या भक्ती पोटी,
उभा राहिला जगजेठी
भक्ता वाचून त्यालाही करमेना
मन आता कुठेही रुळेना 1
चांगदेवाला भेटाया,
गेले हो ज्ञानराया
भिंत कशी चाले हे उमजेना
मन आता कुठेही रुळेना 2
तुकोबाचे ग्रंथ बुडले
ती पाण्यावरती धरले
चमत्कार झाला हे पटेना,
मन आता कुठेही रुळेना 3
गोरोबा चा आवा विझला,
मांजर मडक्यातून आले
जीव कुठे होता हे समजेना,
मन आता कुठेही रुळेना 4
पंढरीला जाऊन आलो,
दर्शन मी घेऊन आलो
आता कुठे जावे हे कळेना,
मन माझे कुठेही रूळे ना 5
