एक चांदणी
एक चांदणी
रात्री आकाशाकडे बघताना मनात पोकळी भासते
दूर तिथे एक चांदणी प्रथमच गगनी दिसते
यापूर्वी तिथे कधीही चांदणी दिसली नव्हती
तेव्हा मनाच्या कप्प्यात कुठेच पोकळी नव्हती
नियतीने केला घात तो बघत राहिला
तिने दिलेल्या यातना तो भोगत राहिला
वचनबद्ध होती सोबत,ती सोडून गेली,
दूर तिथे गगनात चांदणी होऊन गेली
