हाव पैशाची
हाव पैशाची
पैशाच्या मागे धावताना कुणी मागे वळून बघत नाही
आपल्यामुळे कुणाला त्रास होतो हा विचार करत नाही
काहींची पैशाची हाव कधीच मिटत नाही
त्यांना आयुष्यात समाधान मिळत नाही
गरजा पूर्ण झाल्यावर कुठे तरी थांबायला पाहिजे
दुखावलेल्या मनांचा ही थोडा विचार केला पाहिजे
आयुष्य संपल्यावर सर्व संपत्ती इथेच राहून जाते
स्मशानाकडे जाताना एक कफन फक्त सोबत येते
स्वतःच्या नावासाठी मनुष्य हा धडपडत असतो
मोठेपणा दाखवितांना स्वतःलाच फसवत असतो
प्राण गेल्यावर घराबाहेर मनुष्य असतो तिरडीवर
कुणी प्रेत तर कुणी शव, तर कुणी म्हणतात कलेवर
अशी ही गती आहे प्रत्येकाची या जगात
म्हणून शांती समाधानाने जगावे आयुष्यात.
