काय मी केला गुन्हा
काय मी केला गुन्हा
काय मी केला गुन्हा
का असा सूड घेतेस
पुन्हा पुन्हा मला त्या
जुन्या आठवणीत नेतेस || 0 ||
विसरायचंय मला सारं
आता ते स्मरण नको
प्रत्येक क्षणी मरणारं
ते जुनं मरण नको
पुन्हा पुन्हा का तू
माझ्या जीवनात येतेस || 1 ||
काय चूक झाली माझी
नजरानजर तुझी झाली
स्टार माझे चूक होते
जीवनात माझ्या तू आली
का असा पुन्हा पुन्हा
मला तू त्रास देतेस || 2 ||