जाणारच होतीस सोडून
जाणारच होतीस सोडून
जाणारच होतीस सोडून
तर कशाला लावायचा लळा,
नको नको म्हणत असताना
कसा आला कळवळा.
कितीही नाही म्हटलं तरी
त्या दिवसाची आठवण येते,
अन आपसूकच डोळ्यांमधील
अश्रू गालांवर ओघळते.
रडून घेतो हल्ली थोडे थोडे
मन मोकळे करण्यासाठी,
ना राहोत शिल्लक आसवे
त्या दिवशी गाळण्यासाठी.
म्हणतेस तू की मी
काहीच ना सांगितले,
अन समजा की तुम्ही
काहीच ना ऐकले.
अगं खरंच विसरणे हे
इतके का सोपे असते ?
मग थोडेसे बोलले तर
का तुला वाईट वाटते ?
विचाराने तुझ्या मन कसे
माझे बेचैन होते,
कावरीबावरी नजर माझी
तुला शोधत फिरते.
कावरीबावरी नजर माझी
तुला शोधत फिरते.
