STORYMIRROR

Raakesh More

Romance Tragedy Others

3  

Raakesh More

Romance Tragedy Others

मला उध्वस्त करून जा

मला उध्वस्त करून जा

1 min
146

वादळासारखी मला 

उध्वस्त करून जा 

आज तू माझा 

अस्त करून जा || 0 ||


तुडवून जा पायदळी 

मन हे माझं 

भावनेचं किमती 

धन हे माझं 

किंमत माझ्या प्रेमाची 

स्वस्त करून जा || 1 ||


संभ्रमित मला करण्याची 

तुला मुभा आहे 

जिथे सोडलंस मला 

तिथेच उभा आहे 

तूझ्याच वेडात 

व्यस्त करून जा || 2 ||


बरबाद कर मला 

तुला वाटेल तसं 

मांजर खेळतं 

मूषक सोबत जसं 

शहाणा होत तर नाही ना

ही गस्त देऊन जा || 3 ||


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance