कवडसा
कवडसा
कवडसा मुठीत धरण्याचा
उगीच मी प्रयत्न केला
तुला शोधण्यामध्ये माझा
अर्धा जन्म वाया गेला
आता बसतो
अंधारात चांदण्याचा खेळ पाहत
प्रयत्न करतो विसरण्याचा
मनामधून तू नाही जात
समुद्रकाठी वाळूवरती
नाव तुझे लिहीत बसतो
नाव तुझे लिहता लिहता
स्वतःशीच हसत असतो
कोणी म्हणतो वेडा मला
कोणी म्हणतो खुळचटालेला
प्रेमामध्ये कुणी तरी?
वाट आहे भरकतलेला
आजही गाणे गुणगुणताना
ओठी नांव येते
कळत नाही मन कसे
तुझ्यासाठी धाव घेते
