कुटुंब
कुटुंब
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
159
हे विश्वचि माझे घर
सांगून गेले ज्ञानेश्वर.
ज्ञानाचा सागर आपले संत ज्ञानेश्वर.
ज्ञान दिले हो जगास साऱ्या.
सांगितले मराठीचे कौतुक.
उपनिशिधानेही म्हटले येथे वसुदैव कुटुंबकम.
जगास शांतीचा संदेश देऊया
शांतीने आणि सुखात राहू या
उगीच धरावा वैर कशाला?
शांतीची पताका अपुली फडकवू या जगभर
अवघा मानव एक करूया
दानवास गाडून टाकूया
मने मनाशीी पुन्हा जोडूया
एकात्मकतेचा प्रचार करू या चला हो जगभर
वसुंधरा ही कुटुंब अपुले हा करूया जागर