STORYMIRROR

उत्तम गांवकर

Romance

3  

उत्तम गांवकर

Romance

पहिल प्रेम

पहिल प्रेम

1 min
178

पाहून न पाहिल्यासारखं करायचं

 उगीच असतं एकमेकांसाठी झुरायचं

 सांग तूच पहिलं प्रेम कसं ग विसरायचं?

 पहिल्यांदा जेव्हा भेटलो होतो तुला

 स्वर्ग दोनच बोटे उरला होता

 प्रेमात पठ्ठ्या तुझ्याचसाठी हरला होता

 फिरलो -हिंडलो सांगितल्या एकमेकांना

सुखदुःखाच्या गोष्टी

 कधी झालो आनंदी कधी दुःखी कष्टी

 कधी जमली गट्टी तर कधी झालीस तू हट्टी

 नंतर कळलं नाही का तू हिरमुसली

 टाळू लागली मला पुन्हा कधी ना हसली

 कळले नाही मला काय माझे चुकले?

 वाट तुझी पाहता डोळे माझे थकले

 बराच काळ गेला वाहून भेट नाही झाली

 आता कधीच भेटणे नाही आशा ही मावळली


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance