हिवाळा
हिवाळा
1 min
136
हिरव्या शार हिरवळीवर पडला
दव बिंदूंचा सडा
गुलाबी थंडी
घेऊन आला
संगे हो हिवाळा
रोमांचित झाले अंग हे सारे
क्षण क्षण हा मोहरला
वृक्षांनी साऱ्यााा कात टाकल
फुटली त्यांना नवी पालवी
आनंदाने ते माना डोलवी
जणू पुनर्जन्म हा झाला
हिरव्या लतिका हिरवी झाडी
वनिता राणी प्रसन्न झाली
निसर्ग आनंदला
आला हिवाळा आला
हो आलात हिवाळा आला