मित्र
मित्र
1 min
146
तूच सोबती होता
दुःखात अन सुखात
ना सोडलीस साथ
धावून आलास तुचं
आढे वेढे न घेता
धावलास मदतीस
शब्दाची ना केलीस
कधीही घासा-घीस
संकटात माझ्या
मदत तुझीच होती
तू जवळ असताना
भीती मुळीच नव्हती
झालास खूप श्रीमंत
पण चढला नाही माज
मित्रा तुझा रे आहे
गर्व नेहमीच मजला
राहशील स्मरणात कायम
विसरणार नाही मी तुजला
